चित्तराव,
अदिती हा बरोबर शब्द आहे. त्यामागची कथा अशी आहेः

पूर्वी दिती आणि अदिती अशा दोन बहिणी होत्या. जी दिती नाही ती अदिती अशी अदिती नावाची व्युत्पत्ती सांगितली आहे. दिती म्हणजे काय ते मला माहित नाही पण मी शोधून सांगेन.
तर, दितीचे पुत्र ते दैत्य अर्थात राक्षस आणि अदितीचे पुत्र ते आदित्य अर्थात देव. त्यामुळे अदिती ही देवमाता आहे. वैदिक दैवतशास्त्र अर्थात mythology मधे ही आणि अशा अनेक छान छान गोष्टी सांगितल्या आहेत. मला जमेल तशा त्याही मी मनोगतावर लिहिण्याचा प्रयत्न करेन. ऋग्वेदामधे आदित्य ही वेगळी देवता सांगितली असून आदित्य एकूण बारा होते. सूर्य त्यांच्यातला एक होता. पुढे नंतरच्या काळात ते सूर्याचं नाव म्हणून रूढ झालं.
तुमच्या शंकेचं समाधान झालं असावं अशी आशा आहे.
(शुद्ध!)अदिती