वरदादेवी नमस्कार,

वातावरणशास्त्राची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरांत सुफळ संपूर्ण केलीत. मनोगतावर संदर्भसाधन उपलब्ध केलेत. धन्यवाद. नवीन माहिती, व्यवस्थित मराठीकरण आणि कालपरत्वे वर्गीकरण यांमुळे लेखन सुशोभित व उपयुक्त झाले आहे.

मात्र खालील किरकोळ सुधार सुचवावेसे वाटतात.
हवामानातील विविध कृतींची (processes) = हवामानातील प्रक्रियांची
गणिती (numerical) = अंकगणितीय
पटीय (spectral) = वर्णपटीय
द्विवार्षिक (सुमारे २३ महिन्यांचे चक्र) कंपन  = याजागी कंपन साठी आंदोलन शब्द उचित ठरेल असे वाटते.

असो. पण सद्यकालीन देशातील वातावरणासंदर्भातील शैक्षणिक स्थितीचे उत्तम विवरण देऊन एका उन्नयनमार्गावर चांगलाच प्रकाश टाकला आहेत.

यासंदर्भात एक उत्सुकता अशी आहे की ज्या ऑफ शोअर व्होर्टेक्स चा उल्लेख मुंबईतील २६-०७-२००५ च्या घटनेचा उहापोह करतांना नेहमीच केल्या जातो त्यासंदर्भात आपण काय सांगू शकाल? आपल्यासारख्या तज्ञ व्यक्तीकडून आमच्या गंभीर समस्येबाबतची माहिती मिळाल्यास सोनियास सुगंध येईल.

पुन्हा एकदा धन्यवाद व पुढाकाराखातर हार्दिक अभिनंदन!
आपल्या व्यासंगी अभिव्यक्तीचा मनोगतास कायम लाभ होवो.