माझ्या नेहमीच्या लिनक्सच्या
डब्यावर मी बरेच घोळ घातलेले असल्याने मला खात्री नव्हती की नक्की कशामुळे
मी देवनागरी पाहू आणि लिहू शकतो. आजच मी नवीन डब्यावर लिनक्स (फेडोरा कोअर
३) इंस्टॉल करून पाहिले. फायरफॉक्समध्ये ऱ्हस्व वेलांट्या आणि जोडाक्षरे
ठीक दिसत नव्हती पण खालील प्रकारे फायरफॉक्स सुरू करताच अगदी व्यवस्थित
दिसू लागले.
टर्मिनल खिडकीत खालीलप्रमाणे आज्ञा द्या,
[root@localhost ~]# MOZ_ENABLE_PANGO=1 firefox
फायरफॉक्सची खिडकी उघडेल आणि सर्व काही व्यवस्थित दिसू लागेल. हा
प्रतिसादही मी तिथेच लिहितोय. हे फ़ेडोरा कोअर ३ च्या पहिल्या
डिस्ट्रिब्युशन बरोबर आलेल्या ग्नोम प्रणालीवर केले आहे.
फेडोरा
कोअर ४ मध्ये हेही करावे लागत नाही, ते आधीच केलेले असते. फायरफॉक्स आणि
फेडोराविषयी अधिक माहितीसाठी खालील चित्रांवर टिचकी मारा.


आपला,
(मुक्त-संगणक-प्रणाली-वादी) शशांक