आगाऊराव.....
कसं काय होणार हो तुमचं आयुष्यात?
आपल्या देशावर फक्त इंग्रजांनीच राज्य केलं पण अस्सल हिंदू देवतांच्या चोरट्या मार्गाने बाहेर नेलेल्या(smuggle केलेल्य हो.....) मूर्ती जगभर सापडतात. इजिप्त मधल्य प्राचीन वस्तू इजिप्त सोडून इतरच ठिकाणी जास्त सापडतात. त्या तिथे कशा गेल्या असं पण विचारणार का तुम्ही?
पाश्चात्य लोकांनी चीन मधून अवैध मार्गाने चहाच्या बिया पळवल्या. ब्राझीलमधून रबराच्या बिया पळवल्या. दक्षिण अमेरिकेतल्या समृद्ध राज्यांमधून अक्षरशः किलोकिलोने सोने-चांदी लुटली.आफ्रिकेतल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली.
एखाद्या लहान मुलाने हट्टाने सगळं स्वतःलाच मिळालं पाहिजे म्हणून गोंधळ घालावा तसं या पाश्चात्य जगाने इतर जगाला वेठीला धरलं आणि उत्तमोत्तम गोष्टी त्यांच्या मूळ स्थानापासून हलवल्या हे सत्य आहे.जिथे वैभवशाली वस्तू आणि संपत्तीची ही अवस्था तिथे साहित्याचं काय हो?
ऋग्वेदाचा अभ्यास करणाऱ्या काही पहिल्या शिलेदारांपैकी एक मॅक्स्म्युलर पण होते जे जर्मन होते. जर्मन लोक स्वतःला आर्य म्हणवतात हे तुम्ही ऐकलंच असेल ना? आपल्या साहित्याचा त्यांना सोयिस्कर अर्थ लावून कागदी घोडे नाचवून इथल्या लोकांना तुच्छ म्हणायची पाश्चात्यांची खोड बरीच जुनी आहे(खरे आर्य ते असं त्यांचं नेहेमीच म्हणणं पडलं आहे). इलियड आणि ओडेसी या दोन महाकाव्यांची नक्कल करून(आजच्या भाषेत inspire होऊन) रामायण-महाभारत लिहिले गेल्याचे आरोप याच लोकांनी केलेले आहेत.
असो. मला इथे चर्चा करायची आहे. वितंडवाद घालायचा नाही. हे लेखन वाचून जर मित्र-मनोगतींना कुठेतरी विचार करावासा वाटला तरी त्याचा उद्देश सफल होईल. आणि चर्चेत मतभेद हे व्हायचेच त्यात चिडायचं काय हो? पण मतभेद जेव्हा विरोधासाठी विरोध किंवा उगाचच वाद घालायचा म्हणून काही बोलणं या टप्प्यावर पोचतील तेव्हा मात्र मला नाइलाजाने चर्चा बंद करावी लागेल आणि कदाचित इथून निघूनही जावं लागेल....
चू भू द्या घ्या
अदिती