हा आणि याआधीचा भाग एकदमच वाचले. दोन्ही भाग आणि यापूर्वीचेही भाग खूपच माहितीपूर्ण आहेत. लेखमालेसाठी तुमचे अभिनंदन आणि आभार.
भारतामध्ये पुणे विद्यापीठामध्ये हवामानशास्त्र हा भौतिकशास्त्राचा उपविषय म्हणून विज्ञान विशारद (B.Sc.) व विज्ञान निष्णात (M.Sc.) ह्या पदव्यांसाठीच्या अभ्यासक्रमांमध्ये निवडता येतो. शिवाय हवामानशात्र ह्या विषयात विज्ञान निष्णात............ युरोपातील व उत्तर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्येही विशारद, निष्णात व पंडित पातळीवर हवामानशास्त्राचा अभ्यासक्रम निवडता येतो. ह्या अभ्यासक्रमांमुळे विविध शासकीय संस्थांव्यतिरिक्त विद्यापीठे ही हवामानशास्त्र विषयाची संशोधन केंद्रे बनली आहेत.