स्वाती, कशाला लिहिलेस गं हे धिरडं इकडे? पोटात खळबळ उडाली आहे पण धिरडे मिळणार आहेत थोडीच खायला.. :(( आणि शेंगदाण्याची दह्यातली चटणी.. काळीज खल्लाऽऽऽस.. त्यात दही जर सायीचं असेल तर....... ताट चाटूनपुसून झालं की मग आईला पोचपावती मिळते,"आई, एक्क्कक्क्कद्दम टेरिफिक झालेत गं धिरडे.."
"खूप लवकर सांगितलंस की.."
"अगं खाण्यातून सवड मिळेल माझ्या तोंडाला तर सांगणार ना मी तुला.. करतेसच इतके झक्क्क्कास की हातातोंडात इतकं अंतर ते का असतं याबद्दल चडफडाट होतो.. "
मुगाचेच खाल्ले आहेत.. उडीद टाकते की नाही बघायला जरा आईच्या स्वयंपाकखोलीतल्या राज्यात आरँडी करावी लागेल..