स्पृहणीय हा शब्द मूळ स्पृह् ( १० गण उभयपद)= इच्छा करणे ह्या धातूपासून तयार झाला आहे. हे कर्मणि विध्यर्थ धातुसाधित विशेषण आहे.
त्याचा प्रचलित अर्थ--- १) इच्छा करण्याजोगे २) प्रशंसनीय ३) स्तुत्य ४) स्पृह्य ५) श्लाघ्य.
स्पृहा म्हणजे इच्छा. हा शब्द प्रशंसनीय ह्या अर्थी जास्त वापरात आहे. जसे --त्याने स्पृहणीय यश संपादन केले.