नमस्ते माधवराव.
माझ्या मायबोलीचा पर्यायाने माझ्या मातेचा जो मान राखेल त्याचा सन्मान आम्ही करू - महाराष्ट्रात राहून - येथल्या सोयी सुविधा घेऊन वर मराठीला कस्पटासमान लेखणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याशी जाणून बुजून मराठीत बोलले पाहिजे.
(माझी टिप्पणी: आज़तागायत किती लोकांना धडा शिकवला गेला आहे, आणि त्यातून असे किती लोक योग्य तो धडा शिकले आहेत, व त्यांनी आपले वर्तन सुधारले आहे हे मुंबई-पुण्यातल्या हिंदीच्या वाढत्या प्रभावाने दिसतेच आहे! गरज़ आहे ती नुसत्या 'बोलक्या' मातृभाषाप्रेमाची नव्हे, तर 'कर्त्या' मातृभाषाप्रेमाची! आणि त्यासाठी आवश्यक आहे स्पष्ट विचार, मग भलेही तो प्रस्थापित शहाणपणाच्या विरोधात ज़ाणारा, अपारंपरिकही का असेना!)
आपण अगस्तिमहोदयांच्या ज्या प्रतिसादाशी सहमती दर्शवलीत त्याला मराठाभाऊनी 'प्रतिक्रिया' नावाच्या प्रतिसादात तसेच 'उ.ः असहमत' या प्रतिसादात खाली मुद्देवार उत्तरे दिली आहेत.
तसेच वृकोदर यांच्या 'मुद्देसूद व तर्कशुद्ध' या प्रतिसादातही त्यावर मतप्रदर्शन केले आहे!
तर अगस्तिमहोदयांच्या प्रतिसादातले कुठले मुद्दे शिल्लक उरतात तेही त्यापुढे आपण मांडलेत, किंवा मराठाभाऊच्या मुद्द्यांचे खंडन केलेत तर चर्चा एकांगी न राहाता तिला अधिक योग्य दिशा मिळू शकेल.
धन्यवाद!
फ़ैज़