आज़तागायत किती लोकांना धडा शिकवला गेला आहे-

आपण असा प्रयत्न करून पाहिला आहे का ? - मी केलेला प्रयत्न काही अंशी यशस्वी झाल्याचा प्रत्यय मला आलेला आहे. आकडेवारी पेक्षा मला लाभलेले स्व- स्वाभिमानाचे समाधान मी महत्वाचे मानतो !

त्यांनी आपले वर्तन सुधारले आहे हे मुंबई-पुण्यातल्या हिंदीच्या वाढत्या प्रभावाने दिसतेच आहे!

प्रभाव हा भाषेचा पडलेला नसून घुसखोरीचा पडलेला आहे.... बाळासाहेब ठाकरेंनी पंधरा वर्षांपुर्वी सुचवलेले होते घुसखोरी रोखा - तेव्हाच ऐकले असतेत तर आज चर्चा करायला वेगळा विषय निवडावा लागला असता !!! 

गरज़ आहे ती नुसत्या 'बोलक्या' मातृभाषाप्रेमाची नव्हे, तर 'कर्त्या' मातृभाषाप्रेमाची!

समाधान वाटले ! मी काही तरी प्रयत्न केल्याचे व त्याबद्दल आपल्या सारख्यांनी नोंद घेतल्याचे - आपला व माझा संपर्क आजच झालाय - आपले 'व्यक्तिमत्व' व कर्तुत्व पण हळुहळू कळेलच की !

चर्चा व वादंग ह्या व फक्त ह्याच विषयाचे उद्दिष्ठ्य काही मंडंळींचे असल्याचे जाणवते...... स्वतः आरतीचे तबक घेउन स्वतःच्या तोंडाला दिवे ओवाळणारे ह्या पुर्वीही आले होते !!!

माझ्या मायबोलीचा पर्यायाने माझ्या मातेचा जो मान राखेल त्याचा सन्मान आम्ही करू - महाराष्ट्रात राहून - येथल्या सोयी सुविधा घेऊन वर मराठीला कस्पटासमान लेखणाऱ्या व्यक्तींना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याशी जाणून बुजून मराठीत बोलले पाहिजे.

हा माझा विचार आहे....... आपणांस मान्य असल्यास तसे लिहा अन्यथा आपल्या वाद घालण्याने मी माझा विचार बदलेन अशी अपेक्षा बाळगणे आपले दिवास्वप्न ठरेल....

आपण अगस्तिमहोदयांच्या ज्या प्रतिसादाशी सहमती दर्शवलीत त्याला मराठाभाऊनी 'प्रतिक्रिया' नावाच्या प्रतिसादात तसेच 'उ.ः असहमत' या प्रतिसादात खाली मुद्देवार उत्तरे दिली आहेत.

ती मी वाचेनच हो ..... आपण कश्याल्ला कुण्णाची भल्लामण कर्ताय्य?

बर्र....... एक सांग्गा - तुमच्या लिखाण्याच्या पद्धतीवरून आपण ह्या पुर्वीही एका वादंगात होतो हे माझ्या ध्यान्यांत येतय ! त्या वादंगात तुमचे सुरुवातीला व्य. नी. बंद झाले मग "मनोगत"वर येण बंद झाले असे काहीसे वाटतेय - आपण दोघोही यापुर्वी वादंगात होतो का ? मी तर माझे नांव बदलू शकत नाही पण आपणांस ह्या प्रकाराबद्दल जास्त कल्पना असावी म्हणून विचारले !!!

माधव कुळकर्णी.