आकडेवारीचा निकष घेताय का राव ? महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या खेड्यापाड्यांतून जाऊन विचारा.......
हिंदीत नव्हे..... इंग्रजी त विचारा........
फक्त एकच प्रश्न विचारा...................
उत्तर कोणत्या भाषेत मिळते ते येथे येऊन प्रामाणिक पणे सांगा....
आहे हिम्मत ???
इंग्रजी ची भलामण करण्या आधी आपल्या देशात ती भाषा वापरली जाते की नाही ते तपासा....
मुंबईतल्या मी राहतं असलेल्या सोसायटीतली जनरल बॉडी मीटींग आवर्जून हिंदीत होते........ कारण ? इंग्रजी येतच नाही बऱ्याच जणांना ......
इथे ही अवस्था तर "नांदेड" मध्ये आपण मराठी व्यतिरिक्त कुठली भाषा वापराल ..... ? मग "मेरठ" मध्ये कुठली ? "जयपुर" किंवा "उडपी" ला आपण कुठली भाषा - भाषण देण्यायोग्य समजाल ?
इंग्रजी ? ? ?
डोळ्यावर "इंग्रजी" कातडं ओढलं तरी मी प्रामाणिक पणे नाहीच म्हणेन !!!