नमस्ते माधवराव!
(आपण एकूण तीन उपप्रतिसाद दिलेत, त्या सर्वांनाही इथे उत्तर दिले आहे.)
माझा आधीचा उपप्रतिसाद
माधवरावांची वाक्ये
चर्चेतील उद्धृते
आपण असा प्रयत्न करून पाहिला आहे का ? - मी केलेला प्रयत्न काही अंशी यशस्वी झाल्याचा प्रत्यय मला आलेला आहे. आकडेवारी पेक्षा मला लाभलेले स्व- स्वाभिमानाचे समाधान मी महत्वाचे मानतो !
- मान्य. आकडेवारी अनावश्यक आहे. ज़र आपल्या पद्धतीने मराठीचे हितरक्षण होणार असेल, तर उत्तमच.
पण सदरच्या चर्चेत पुढे आलेल्या मुद्द्यांप्रमाणे मराठी माणसाच्या हिंदीच्या अतिरेकी स्वीकारामुळे मराठीला तोटा होत आहे (ज़से की, आपणच लिहिल्याप्रमाणे घुसखोरीचा प्रश्न निर्माण होत आहे) आणि त्याला हालवून धक्के दिल्याशिवाय यात दुरुस्ती होणे कठीण.
ज़र आपले व्यक्तिगत मराठीप्रेम हे अशा प्रकारे दुरुस्ती करण्यात यशस्वी होत असेल, तर त्यात आनंदच आहे!
(स्व-स्वाभिमान? - श्री श्री रविशंकर? - हलकेच घ्या!)
त्यांनी आपले वर्तन सुधारले आहे हे मुंबई-पुण्यातल्या हिंदीच्या वाढत्या प्रभावाने दिसतेच आहे!
प्रभाव हा भाषेचा पडलेला नसून घुसखोरीचा पडलेला आहे.... बाळासाहेब ठाकरेंनी पंधरा वर्षांपुर्वी सुचवलेले होते घुसखोरी रोखा - तेव्हाच ऐकले असतेत तर आज चर्चा करायला वेगळा विषय निवडावा लागला असता !!!
बरोबर! पण तेव्हा आम्ही ऐकले नाही हे तर खरे ना? म्हणून आज़ ही पाळी आलेय!
आणि आता दिवस बदललेत! बाळासाहेबांनी मराठीचा झेंडा सोडून हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे! तेव्हा सामान्यांची स्वभाषारक्षणाची वाटचाल ही आता वीस वर्षांपूर्वी शिवसेना साथीला होती तितकी सोपी राहिली नाही!
शिवाय ही घुसखोरी हिंदी व मराठीच्या साधर्म्यामुळे कशी होते हेच तर प्रस्तुत चर्चेत पुढे आले आहे.
अन्य एक प्रतिसाद (माझा नव्हे, मराठाभाऊचा) उद्धृत करायचा तर
(महाराष्ट्राचे हिंदी प्रेम (सुबत्ता, स्थैर्य, मराठी माणसाचा स्वभाव नव्हे) हे एकच कारण या स्थलांतराला कारणीभूत आहे का?).
- पहिले म्हणजे महाराष्ट्रात ठोकळ सुबत्ता व स्थैर्य हे भारतातील अन्य बहुतेक राज्यांपेक्षा अधिक आहे, आणि ते मराठी माणसाने निर्माण केले आहे, परक्यांनी नव्हे! त्यामुळे त्या कंसातील विधानाशी मी सहमत नाही.
बाकी आपल्या प्रश्नाचे उत्तर हे बहुतांशी होकारार्थी आहे.
मराठी संस्कृतीच्या योगे आपण प्रगती केली. (ज़शी अमेरिकेच्या प्रगतीमागे त्यांची विशिष्ट व्यवस्था होती, तशीच.) त्यामुळे आपण विकासाच्या ओढीने येणाऱ्या सर्वांचे भक्ष्य बनतोच. (ज़से अमेरिकेतील मुक्त व्यवस्था ही सर्वांना आकर्षित करते तसेच.) पण तशी अन्य विकसित राज्ये का बनत नाहीत? (स्कॅंडेनेव्हियन देशांत किंवा जर्मनी, जपान, फ्रान्समध्ये स्थलांतरे का होत नाहीत?) तर त्याचे कारण आपण अधिक स्वागततत्पर आहोत. आणि त्यामध्ये आपली लिपी, आणि हिंदीचा निमूट विनातक्रार वापर हे मुख्य घटक!
हा माझा विचार आहे....... आपणांस मान्य असल्यास तसे लिहा
- मान्य आहे! शंकाच नको!
गरज़ आहे ती नुसत्या 'बोलक्या' मातृभाषाप्रेमाची नव्हे, तर 'कर्त्या' मातृभाषाप्रेमाची!
समाधान वाटले ! मी काही तरी प्रयत्न केल्याचे व त्याबद्दल आपल्या सारख्यांनी नोंद घेतल्याचे - आपला व माझा संपर्क आजच झालाय - आपले 'व्यक्तिमत्व' व कर्तुत्व पण हळुहळू कळेलच की !
- माझे वरील विधान व्यक्तिशः आपल्याला उद्देशून आहे अशी आपली समज़ूत झाली असल्यास मी आपली क्षमा मागतो!
त्या विधानाचा अर्थ असा होता की केवळ मातृभाषेत बोलून आता काही साध्य होणे कठीण आहे, त्यासोबत कृती (ज़शी की मराठी ग्राहकांशी मराठीच बोलणाऱ्या दुकानदारांना आश्रय देणे इ. - अधिक तपशिलासाठी कृपया माझा 'आढावा' हा प्रतिसाद पाहा!) आवश्यक आहे. (म्हणून ते शब्द अवतरणचिन्हांत! ज़र मला 'बोलके सुधारक/कर्ते सुधारक' हा संदर्भ ज़साच्या तसा वापरायचा असता, तर ते अख्खे वाक्य अवतरणांत टाकले असते!)
चर्चा व वादंग ह्या व फक्त ह्याच विषयाचे उद्दिष्ठ्य काही मंडंळींचे असल्याचे जाणवते......
उद्दिष्ट.
इथे - म्हणजे या प्रस्तुत चर्चासूत्रावर - चर्चा हे उद्दिष्ट इतके दिवस दिसत होते. वादंग हे उद्दिष्ट असल्याचे ज़ाणवले नाही.
आपण अगस्तिमहोदयांच्या ज्या प्रतिसादाशी सहमती दर्शवलीत त्याला मराठाभाऊनी 'प्रतिक्रिया' नावाच्या प्रतिसादात तसेच 'उ.ः असहमत' या प्रतिसादात खाली मुद्देवार उत्तरे दिली आहेत.
ती मी वाचेनच हो ..... आपण कश्याल्ला कुण्णाची भल्लामण कर्ताय्य?
आपली शब्द लिहिण्याची शैली आवडली! नवीन आहे.
मी भलामण केली कारण आपल्या प्रतिसादात आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण नव्हते, ते मिळाले तर माझे (व अन्य इच्छुकांचेही) प्रबोधन होवून विचारांत स्पष्टता येईल अशी आशा होती!
मुद्द्याला मराठी / अ-मराठी चे स्वरूप देण्याचा हेतू पुरस्पर प्रयत्न केला जातोय.... जो मूळ मुद्दा नाही !!!
मला तर मराठाभ्ॐचा मूळ लेख वाचून असेच वाटतेय की मुद्दा मराठी/अ-मराठी हा आहेच आहे. आणि त्यात पुढे मराठीच्या हितरक्षणासाठी म्हणून मग महाराष्ट्रात दुसरी भाषा कुठली? तर हिंदी नको, इंग्रजी हवी.. चर्चेचा प्रस्ताव हा असा आला आहे, आणि मला वाटते बहुतेकांनी त्याला प्रतिक्रिया याच समज़ुतीतून दिली आहे.
इंग्रजी ची भलामण करण्या आधी आपल्या देशात ती भाषा वापरली जाते की नाही ते तपासा....
मुंबईतल्या मी राहतं असलेल्या सोसायटीतली जनरल बॉडी मीटींग आवर्जून हिंदीत होते........ कारण ? इंग्रजी येतच नाही बऱ्याच जणांना ......
या दोन्ही मुद्द्यांना पुरेशी उत्तरे या चर्चासूत्रात दिली गेली आहेत. एकाच ज़ागी हे सर्व मुद्दे पाहायचे तर कृपया "उः दुवा - समांतर चर्चेचा" हा मराठाभाऊचा किंवा "आढावा" हा माझा प्रतिसाद पाहा.
मराठी माणसाच्या इंग्रजीविषयीच्या उदासीनतेचे कारण त्याचे इंग्रजीचे अज्ञान, भय, न्यूनगंड हे आहे असे येथे कुणीसे मांडले आहे. मृदुलादिदींनी बहुधा. परंतु त्यातून सुटका ही पळून ज़ावून होणार नाही, तर इंग्रजीचा वापर करूनच होईल हे स्पष्ट आहे. शिवाय प्रगतीसाठी गरज़ेची इंग्रजी, हिंदी नव्हे.
इथे ही अवस्था तर "नांदेड" मध्ये आपण मराठी व्यतिरिक्त कुठली भाषा वापराल ..... ? मग "मेरठ" मध्ये कुठली ? "जयपुर" किंवा "उडपी" ला आपण कुठली भाषा - भाषण देण्यायोग्य समजाल ?
मुद्दा महाराष्ट्रात कुठली भाषा वापरावी हा आहे. नांदेडमध्ये मराठीनंतर इंग्रजीला उत्तेजन द्या असा या चर्चेचा आत्तापर्यंतचा आशय आहे.
आणि मुळातच, ज्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना केवळ स्थानिक भाषेचा वापर करूनच व्यवस्थित ज़गता यायला हवे असे मी इथे एकाहून अधिक प्रतिसादांत (खुद्द चर्चा प्रस्तुत करणाऱ्या मराठाभाऊच्याही) वाचले आहे. त्यामुळे मेरठेत हिंदी ही स्वाभाविकच आहे.
याचे उत्तर साक्षरता वाढवून, स्थानिक भाषांचा कामकाज़ातील वापर वाढवून द्यायला हवे, अन्य कुठल्या तरी प्रांतांतील मिळून चाळीस टक्के लोक बोलू शकतात म्हणून एक परकी भाषा लादून नव्हे! इंग्रजी येवो अगर न येवो, हिंदी येवो अगर न येवो, शेतकऱ्यांना, मज़ुरांना त्यांच्या स्थानिक भाषेच्या वापरातच व्यवस्थित ज़गता यायला हवे.
आणि या दृष्टीने पावले उचलली ज़ात आहेतच. उदाहरणार्थ....
(माझी टिप्पणी: विशाखापट्टणात, चेन्नईत, होसूरमध्ये इ. ठिकाणी हिंदीतून बोलणे किती 'आनंदप्रद' व 'सोयीस्कर' असते याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे!)
बर्र....... एक सांग्गा - तुमच्या लिखाण्याच्या पद्धतीवरून आपण ह्या पुर्वीही एका वादंगात होतो हे माझ्या ध्यान्यांत येतय ! त्या वादंगात तुमचे सुरुवातीला व्य. नी. बंद झाले मग "मनोगत"वर येण बंद झाले असे काहीसे वाटतेय - आपण दोघोही यापुर्वी वादंगात होतो का ? मी तर माझे नांव बदलू शकत नाही पण आपणांस ह्या प्रकाराबद्दल जास्त कल्पना असावी म्हणून विचारले !!!
मी गेल्या एका वर्षाहून अधिक काळ या पीठाचा सदस्य आहे. (आपण २२ आठवडे आहात का?) या अवधीत मी इथे फारतर दहावेळा आलो असेन आणि फार तर चार लेखसूत्रांत भाग घेतला असेल. (हे सर्व माझ्या व्यक्तिगत परिचयात पाहून खात्री करून घेता येईल.) त्यांतील एकाही सूत्रात कधी आपली भेट झाल्याचे स्मरत नाही. त्या सर्व सूत्रांना परत भेट देवून खात्री करून घेतली!
मी काल प्रथम व्यक्तिगत निरोप या सोयीचा वापर केला. त्यामुळे पूर्वी ते बंद होण्याचा सवाल नाही.
गेल्या वर्षभरात माझे प्रवेशनाम (login name) व दाखवण्याचे नाव (display name) दोन्हीही 'ज़िन्दादिल फ़ैज़' हेच आहे. ते बदलण्याची मला गरज़ भासली नाही, आणि काहीही झाले तरी ते बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
त्यामुळे आपला काही तरी गैरसमज़ झाला आहे हे उघड आहे.
या गैरसमज़ाला मी कारणीभूत आहे असे आपल्याला वाटत असल्यास मी पुनश्च आपली माफी मागतो! पण कृपया ही व्यवस्थित चाललेली चर्चा व्यक्तिगत उखळापाखळीकडे ज़ाणार नाही याची आपण दोघेही काळजी घेवू!
धन्यवाद!
फ़ैज़