नमस्ते!

समज़ून घेण्याच्या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणजे प्रतिक्रिया देण्याआधी मूळ चर्चा तिच्या प्रस्तावासह पूर्ण वाचणे. ती वाचायला मी आपल्या या प्रतिसादानंतर सुरुवात केली!

मुद्दा आहे की इंग्रजी वापरावी की हिंदी........ ?

मुद्द्याला मराठी / अ-मराठी चे स्वरूप देण्याचा हेतू पुरस्पर प्रयत्न केला जातोय.... जो मूळ मुद्दा नाही !!!

आपल्या सोयीसाठी, 'प्रतिक्रिया' या नावाच्या प्रतिसादातील मराठ्याचे लेखन उचलून देत आहे.

१) मराठी असे आमुची मायबोली।...... मराठीचे आमच्या आयुष्यातील स्थान अढळ आहे. तिला पर्याय तर दूर, तिच्या जवळपासही दुसरी भाषा पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यावर वाद/चर्चा/उहापोह करण्याचा काही प्रश्नच नाही, आवश्यकता नाही. - अगस्ती

 - ही गोष्ट गृहीतच (given) आहे. वादाचा तो मुद्दाच नव्हे.

पण हिंदी कशी क्रमाक्रमाने मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांतून मराठीला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करत आहे आणि मराठीला केवळ खाज़गी आयुष्याच्या वर्तुळात सीमित करत आहे हे ज़र आपल्याला अनुभवास आले नसेल, तर आश्चर्य आहे! हल्ली पुण्यात टिळक आणि शास्त्री रोडवरील दुकानदारही हिंदीत बोलतात (स्टेशनपासचा परिसर तर कधीचाच हातचा गेला!), उद्या बाजीराव रोडवरही हे झाले तर आश्चर्य वाटू नये. (गरज़ूंनी टिळक स्मारकशेज़ारच्या दुकानांत ज़ावून खात्री करून घ्यावी!)

यासाठीच मी 'महाराष्ट्राने स्वतःला उंबरठ्यावरचे न समज़ता दक्षिण भारतीय समज़ले पाहिजे आणि संघराज्यासंदर्भातल्या सर्व आर्थिक, भाषिक व राजकीय बाबींत त्या राज्यांप्रमाणेच आचरण ठेवले पाहिजे.' असे विधान केले होते. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर नुसते ओझ्याचा बैल अशी भूमिका बजावावी न लागता स्वतःला assert करता येईल. दक्षिण भारतीय राज्ये ज्याप्रमाणे स्वभाषाप्रेमादर दाखवतात, तसाच आपण दाखवणे हे अत्यावश्यक आहेच.

अधिक ज़ाणण्यासाठी 'प्रतिक्रिया' वाचा!

हुश्श..... काही जणांसाठी किती मेहनत करावी लागते नाही .... मी तर माझ्या ५ वर्षांच्या मुली साठीही इतकी मेहनत घेत नाही !!!

पूर्ण सहमत!

फ़ैज़