नाही हो भाषसाहेब, "शेपूट म्हणाल्याबद्दल मला मुळीच राग नाही. आणि त्यामुळे मी डिवचलाही गेलो नाही. (निदान मला तरी असे वाटत नाही.) मी फक्त आपली भूमिका जरा स्पष्ट केली एवढेच.

प्रयत्नांचे म्हणाल तर हे शब्द (कदाचित अट्टाहासानेसुद्धा) वापरायला माझी कधीच ना नव्हती आणि नाही. माझी भूमिका फक्त एवढीच आहे, की हे चांगले शब्द मराठीत उपलब्ध आहेत (आपण काहीसे विसरलो असलो तरीसुद्धा), तेव्हा ते आपण खुशाल वापरू या; "रूढ" वगैरे करण्याचे जनतेवर सोडू या. कारण हे शब्द परत स्वीकारण्या-न स्वीकारण्याचा हक्क सर्वस्वी जनतेचा आहे. या शब्दांची समाजाला पुन्हा तोंडओळख करून देण्याचे काम आपण करू शकतो; ते "प्रचलित" करणे हा निदान माझातरी प्रांत नव्हे, असे मला वाटते. (शेवटी श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...") (संस्कृत शुद्धलेखनाची चूभूद्याघ्या. बहुतेक नसावीच, पण अवग्रहांबद्दल थोडीशी शंका आहे.)

आणि शेपटाचेच म्हणाल, तर शेपटाचे मला वावगे नसल्यामुळे, आपण केलेल्या माझ्या शेपटाच्या उल्लेखाचा मला रागही नाही, आणि आपण काही आगाऊपणा केला असेही मला वाटत नाही. तेव्हा विसरण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

आणि चर्चेचे म्हणाल, तर हो, चांगलेच झाले. आणि यापुढेही अशाच चर्चा चालूच राहतील, अशी आशा बाळगून आहे.

कलोअ.

- टग्या.