हिंदीच्या नावाने आरडा ओरडा करीत असतानाच मायक्रोसॉफ्ट ने हिंदी चे नवीन सॉफ्टवेअर रिलिज केल्याचे आठवले (रामदास आठवले नाही बरं - नाहीतर परत कुणीतरी विषयाच्या तंगड्या तोडेल) चला बिल गेट्स ला तरी भारतीय भाषेचा व्यापारी फायदा उमगला नाही तर भारतीय मंडळी हिंदी की इंग्रजी ह्या गोंधळातच अडकली आहेत.
राधिके, तुझे बरेचसे मुद्दे पटले - मला तर ही चर्चा वाचून स्वतःचे एकदमच परिवर्तन करावेसे वाटतेय....... इंग्रजीच्या प्रसारासाठी काय करू व काय नको असे होऊन गेलेय..... जरा माझे विचार सांगतो बघ पटतात का ते !
१.- आंब्याची पेटी डोक्यावर घेऊन विकायला जायची मला लाज वाटते तरी मी भय्याच्या व त्याच्या हिंदीच्या नावाने खडे फोडणार, म्हणजे फोडणारच व तेही शक्य झाल्यास इंग्रजीत कारण त्यामुळे मला माझे शिक्षण भय्या पुढे पाजळायची संधी मिळेल व त्याची उणी दूणी त्यातून काढता येतील.
२.- माझ्या वाडवडिलाने कधी व्यवसाय केलेलाच नाही- नोकरी एके नोकरी (जीवापाड) जपून धरली असल्याने सर्व हिंदी व्यावसायिकाशी मी दुकानांत गेल्यावर इंग्रजीतच बोलेन मग मला मुगा ऐवजी उडीद घरी आणावे लागले तरी चालेल.
३. - मी माझ्या मुलांना आय ए एस/आय पी एस/एम पी एस सी वगैरे परीक्षांना बसण्याचा सदैव विरोधच करेन व त्याऐवजी रेल्वे/ मनपा/ म्हाडा मध्ये कारकुंड्याची किंवा सॉफ्ट्वेअर प्रोग्रॅमर नावाची पांढऱ्या कॉलरची नोकरीच करायला शिकवेन (जेथे त्यांना भरपूर इंग्रजी बोलण्याचे ज्ञान पाजळता येईल)
४.- जितक्या उस्फुर्ततेने मी मराठाळलेले हिंदी बोलतो (वो धप्पकन गिऱ्या) ते सुधारण्याची अजिबात कल्पना न करता खेड्यापाड्यांमधून इंग्रजीचा प्रसारक म्हणून ख्रिस्ती बांधवांच्या तोडीस तोड काम करेन. (वेळ पडली तर त्यांना बरोबर घेऊन)
५.- भारतीय भाषांना ठार मारण्याच्या व इंग्रजी भाषेची प्रगती भारतात करण्याच्या अजून काही कल्पना असल्यास मी त्यांचा जाहीर प्रसार करेन व तेच माझे कायम उद्दीष्ठ्य असेल