सर्व लेखमाला वाचक व प्रतिसाद/व्य. नि. लेखकांस मनःपूर्वक धन्यवाद. कार्यबाहुल्यामुळे लेखमाला बरीच लांबली, तरीही आवड कायम ठेऊन वाचन करणाऱ्यांचे आभार.

लेखमालेमधे मी काही ठिकाणी 'ह्याबद्दल अधिक माहिती पुढील भागांत पाहू' असे लिहिलेले आहे. मात्र ती माहिती सविस्तरपणे पुढील भागांमधे लिहिली नाही. उदाहरणार्थ एल् निन्यो-ला निन्या व इतर हवामान घटना, हवामान प्रारुपे वगैरे. ह्याचे एक कारण म्हणजे ह्या विषयांची सविस्तर माहिती लिहायची तर तो/ती वेगळा लेख/लेखमाला होऊ शकेल. दुसरे कारण म्हणजे वातावरणीय अभिसरणाच्या आकलनाचा इतिहास लिहिताना ह्या हवामान घटकांची सविस्तर माहिती लिहिली असती तर ते विषयाला सोडून लेखन झाले असते.

त्यामुळे 'सविस्तर माहिती पुढे पाहू' असे मी जेथे लिहिले आहे त्यावरील माहिती मी यथावकाश स्वतंत्र लेखांमध्ये लिहीन. काही मनोगतींनी त्यांच्या आवडीचे हवामानीय प्रश्न/विषय मला सुचवले आहेत, त्यांबद्दलही सवतंत्र लेख लिहीन.

धन्यवाद,

वरदा