विनोदनिर्मीतीबद्दलचा अंदाज बरोबर आहे. फक्त ' ' विसरले आहेत त्यामुळे हे पटकन कळून येत नाही. असो.
कॅच्ड वरुन आठवले. आमचे इंग्रजीचे सर उच्चार मुलांच्या डोक्यात नीट घोळावे म्हणून क्रियापदांचे भूतकाळ २ दा स्पष्ट उच्चारायला लावायचे. स्पष्ट म्हणजे किती? 'हं, म्हणा स्टॉप ऽऽऽऽऽ डं!' 'वॉक ऽऽऽऽऽऽ डं!!' 'कोंब ऽऽऽऽऽ डं!!' 'टॉक ऽऽऽ डं!!' यातल्या 'कोंबडं' वर मुलांना नेहमी हसू यायचं. पण अंगठे धरायला लागू नये म्हणून ते आवरलं जायचं.
(इंग्रज अशा इंग्रजीने देश सोडून गेले असावे असे मलाही वाटते..)