मराठी शब्द हवे आहेत - भाग २ मध्ये कोणीतरी "धाब्यावर बसविणे" म्हणजे काय असे विचारल्याचे वाचले.
तर, धाबा म्हणजे छपराचा एक प्रकार. लाकडी तुकडे एकमेकांना जोडून असले छप्पर तयार करतात. त्यामुळे उन व पावसास ही घरे धाब्यावर बसवतात, असा शब्दप्रयोग प्रचलित आहे.
म्हणजेच "धाब्यावर बसविणे" याचा अर्थ "दूर सारणे", "पर्वा न करणे" असा होऊ शकतो. उदा. नियम धाब्यावर बसविणे.
-भाऊ.