मधुकर नारायणराव गोगटे हे नाव मराठी बद्दल आस्था ठेवणाऱ्यासाठी सुपरिचित असे आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक लेख आणि निबंध लिहले आहेत.
आमच्या आणि त्यांच्या विचारसरणीत काही मूलभूत मतभेद ( आमचे मत मराठीचा विकास हा मराठी लिपीतूनच झाला पाहिजे तर त्यांचे मत वेळप्रसंगी रोमन लिपीचे मराठीकरण करत मराठीचा विकास झाला पाहिजे.) तरी त्यांची कळकळ आणि प्रामाणिकपणा हा गौरवास्पद आहे हे मात्र नक्की.
त्यांच्या संकेतस्थळाचा दुवा त्यांच्या इतर लेखांची समग्र माहिती देईलच.