ऑर्वेल आणि रँड मध्ये तशी तुलना करता येणार नाही. एकतर ऑर्वेलचे लेखन हे अधिक कसदार आणि साहित्यिक मूल्य असलेले मानले जाते.असो.
साम्यवाद म्हणजे साम्यवादी राजवटी नव्हेत असे मला वाटते. पितळ स्टॅलिनसारख्यांचे पडले. साम्यवादाचे पडले नाही, असे मला वाटते. सोवियत संघाचे विघटन झाल्यामुळे साम्यवादाच्या बडवणुकीला(communism bashing) अधिकच शोभिवंतपणा आलेला आहे.
अर्थात, सोवियत संघाची अनेक आर्थिक धोरणे चुकीची होती. त्यामुळेही विघटनास हातभार लागला. हेही खरे.
श्रीमंत वर्गाने आणि मध्यमवर्गाने साम्यवाद्यांचा राग करणे साहजिक आहे. त्यांची आयुष्याची इस्त्री यांच्या बंदमुळे, संपांमुळे बिघडते. फ्लाइट मिस होते. ;)
पण हा वर्ग तसा अगदी मूठभर आहे. तरी खुर्चीवर बसून चर्चा करणे या लोकांना जमते. विशेषतः भारतात. हातावर पोट असणाऱ्या बहुसंख्यांनी, कामगारांनी त्यांची काडीचीही किंमत न केल्यास नवल काय. असो.
माओसारख्या, स्टॅलिनसारख्या साम्यवाद्यांना केवळ हुकूमशहा म्हटलेले बरे. असो.
तूर्तास एवढेच.