मंदार,

डॉमिनिक आणि रोआर्क हे फाउंटनहेड चे दोन आधारस्तंभ आहेत. त्यांची मोहिनी एकदा मनावर पडली की ती तशीच राहते. डॉमिनिक मधे गुणांचा जो समुच्चय झालेला आहे तो अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य आहे. तिच्या सौंदर्याइतकंच तिचं हे वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्व भुरळ घालतं. तिच्या साध्या साध्या वागण्या-बोलण्यातून सुद्धा मोठा अर्थ व्यक्त होतो आणि प्रत्येक वेळी तो नव्याने आणि वेगळा कळत जातो.
गेल वीनन्ड बरोबर रोआर्क ने बांधलेल्या घरात राहताना रोआर्क ने ओळखीचा एक कटाक्ष टाकावा म्हणून तिची झालेली तडफड, लग्नाआधी तिचं रोआर्क ला भेटायला जाणं, स्फोटात हट्टाने सामील होणं, आणि 'only down upto a certain point' हे आत्मसात करून घेणं मनाला भिडतं.
आजपर्यंत आयुष्यात दुःखाचे अनेक क्षण आले. हा क्षण आपण सहन नाही करू शकणार असं वाटलं की कुठूनतरी "down upto a certain point"हे वाक्य मनात उमटतं आणि पुढ्यातल्या प्रसंगापेक्षा सहनशक्तीच मोठी झाली आहे असं लक्षात येतं.
आज या पात्राचा परिचय वाचला आणि अख्खं फाउंटनहेड समोर उभं राहिलं. छान चालला आहे प्रवासऽसाच सुरू राहू दे.

--
धन्यवाद,
सस्नेह अदिती 
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात!