ऑर्वेलचे लेखन हे मलाही श्रेष्ठ वाटते.  १९८४ आणि ऍनिमल फार्ममध्ये त्याने तपशीलवार निर्माण केलेली प्रतिसृष्टी अचंबित करून सोडते. एक एक संकल्पना लाख मोलाची. कम्युनिझमचा एक वास्तववादी पर्याय म्हणून अपयश वा फोलपणा दाखवणाऱ्या कादंबऱ्या या पातळीवर तर जबरदस्त आहेतच, पण निव्वळ एक साहित्य कलाकृती म्हणून पण महान आहेत.

फाउंटन हेड आणि ऍटलास श्रग्ड मध्ये रँड तिचे तत्वज्ञान एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करते, त्या प्रयत्नात साहित्यिक मुल्याशी थोडी तडजोड झाली आहे असे वाटते.  पण तरीही एक अत्युत्कृष्ट कलाकृती यात शंका नाही.

साम्यवाद : यावर आपले एकमत होणार नाही यावर आपले आधीच एकमत झाले आहे नाही का ? :-) तरी संवाद चालू ठेवू...

खर तर मार्क्सचे विश्लेषण बऱ्याच अंशी पटते, पण कम्युनिस्ट राजवट वा श्रमिकांची हुकुमशाही म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे.

आज भारतातही नक्षलवादी, माओवादी या नावाने वावरणारे कम्युनिस्ट दहशतवादी सामान्य जनतेची पिळवणुकच करत आहेत ना?

श्रीमंत वर्गाने आणि मध्यमवर्गाने साम्यवाद्यांचा राग करणे साहजिक आहे. त्यांची आयुष्याची इस्त्री यांच्या बंदमुळे, संपांमुळे बिघडते. फ्लाइट मिस होते. ;)

साम्यवाद्यांना विरोध आमची गैरसोय होते म्हणुन नाही आहे. सोय -गैरसोय एवढा उथळ हा विषयही नाही.

विरोध दोन कारणांसाठी,

१) साम्यवादाला विरोध हा साम्यवाद हा शेवटी माणसाला गुलाम बनवुन त्याचे शोषण करण्याची संघटित धर्म वा राजेशाही यासारखीच  एक नवी पद्धत आहे म्हणून आहे. ऑरवेलने हे अत्यंत प्रभावीपणे दाखवुन दिले आहे. आणि सर्व साम्यवादी राष्ट्रांचे उदाहरण समोर आहेच.

२) भारतीय साम्यवाद्याना विरोध हा ते देशद्रोही आणि भारताच्या शत्रूंशी हातमिळवणी करून देशाचे तुकडे पाडायला टपले आहेत म्हणून आहे.

पण हा वर्ग तसा अगदी मूठभर आहे. तरी खुर्चीवर बसून चर्चा करणे या लोकांना जमते. विशेषतः भारतात. हातावर पोट असणाऱ्या बहुसंख्यांनी, कामगारांनी त्यांची काडीचीही किंमत न केल्यास नवल काय. असो.

सर्व कामगार वगैरे साम्यवाद्यांच्या मागे आहेत असे म्हणयचे आहे का ? गेले हो ते दिवस. सध्या भारतीय मजदूर संघ पहिल्या स्थानावर आहे...

असो... अंत्योदय झाला पाहिजे यात शंका नाही, maybe what we need is a non communist left.