'खोवलेला' नारळ ऐवजी माझ्यामते 'खवलेला' नारळ योग्य आहे.

हल्ली सर्रास खोवलेला असा शब्द वापरतात, परंतु खोवणे म्हणजे खोचणे, खुपसणे. उदाहरणार्थ मुकुटात मानाचा तुरा खोवणे वगैरे. नारळ खवण्याच्या क्रियेत खवणे म्हणजे नारळाचे खवले काढणे असा अर्थ आहे असे वाटते.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

भाजीची चव छानच असेल असे पाककृतीवरून वाटते आहे. करून पाहायला हवी.