उजविणे याची उत्पत्ति अशी-
लग्नात नवरा-नवरी बसताना मुलगी उजव्या बाजूला असते. लग्नविधी नवरामुलगा करतो. त्यास पळीने पाणी घालणे, पूजा करणे, अग्नीला आहुत्या देणे, हाताने तांदुळात नवरीचे नाव लिहिणे असे अनेक विधी असतात. त्यावेळेला त्या नवऱ्याच्या (सर्व कार्ये) करणाऱ्या हातास नवऱ्यामुलीने आपला हात लावल्याने त्या सर्व क्रिया नवऱ्या मुलीनेपण केल्याच असे होते.
अशाप्रकारे मुलीला उजविले म्हणजे (लग्नात) उजव्या बाजूला बसवले - म्हणजे तिचे लग्न करून दिले हा शब्द तयार झाला.
आपला,
परभारतीय