कूस उजवणे हे उगवणे किंवा उजाडणे या शब्दावरून आले आहे.
अर्थात मुळात उजवा=संस्कृत दक्षिण हा शब्द उजाडती दिशा या अर्थाने आला आहे. आपल्या (भारतीय) संस्कृतीमध्ये देवांची दिशा उत्तर मानली जाते. तेव्हा देवाला वंदन करण्यासाठी आणि पूजेसाठी उत्तरेला तोंड करून बसावे असा प्रघात आहे. तसे केले असता उजाडते ती म्हणजे पूर्व दिशा ही ज्या बाजूला ती बाजू उजवी अशी ठरली. त्याविरूद्ध बाजू ती डावी.
संस्कृतमध्ये पूर्वेला प्राची म्हणतात म्हणून उजव्या बाजूला जानवे घालतात त्याला "प्राचीनाविति" असे म्हणतात.
चूभूद्याघ्या
आपला,
परभारतीय