आपला गोंधळ होणे स्वाभाविक आहे. येथे मराठी आणि संस्कृत दिशेच्या आणि शरीराच्या बाजूचा थोडा घोटाळा आहे. बघु या मला स्पष्टीकरण जमते का. थोडा इंग्रजीचा आधार घेतो.
right = मराठी मध्ये - उजवा/उजवी/उजवं शरीराची बाजू तसेच संस्कृत मध्ये दक्षिण
left = मराठीमध्ये - डावा/डावी/डावं शरीराची बाजू तसेच संस्कृतमध्ये वाम
दिशा मात्र मराठी आणि संस्कृत मध्ये तशाच आहेत
पूर्व, प्राची
पश्चीम, प्रतीची (शुद्धलेखन?)
दक्षिण
उत्तर
मराठीमध्ये शरीराच्या right भागाला उजवे का म्हणतो त्याचे स्पष्टीकरण (माझ्या माहितीप्रमाणे) मी दिले होते/आहे. संस्कृतमध्ये right साठी दक्षिण का आले ते मला माहिती नाही.
आणखी एक (गंमतीचा) विचार
right = बरोबर, योग्य, उजवा, दक्षिण (संस्कृत)
left = चूक, अयोग्य, डावा, वाम (संस्कृत)
बघा हे पटते का?
आपला,
परभारतीय