४. मराठी शब्दांऐवजी ~ वगैरेसारख्या अक्षरांनी ही पडताळणी टाळता येत असेल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
जमले. उत्क्रुष्ट/उत्कृष्ट? हा प्रतिसाद वाचा. "=" हे चिह्न वापरून अडचण दूर झाली.
२. आपण जर तसेही सर्वरने दिलेल्या सूचना टाळू शकत असलो तर या सूचनेचा प्रतिसाद देण्याआधीच्या पडताळणीमध्ये समावेश करण्यात काय फायदा? काढूनच टाकावे या पडताळणीला.
अपरिहार्य कारणासाठी रोमन लिपी वापरावी लागत असेल तर असे करणे गैर ठरू नये असे वाटते.
जे 'spelling' रोमन लिपीत लिहिल्याने एका क्षणात समजते तेच 'एस पी इ एल एल आय एन जी' लिहिल्याने समजायला वेळ लागतो असे वाटते.
हा प्रकार म्हणजे नियम मोडण्याचा प्रयत्न नसून 'मनोगत'च्या नियमांचा मान राखून प्रभावी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.
अती इंग्रजाळलेले लेखन असेल तर ते लेखन काढून टाकण्याचे आणि/अथवा बदलण्याचे सर्वाधिकार प्रशासनाकडे शाबूत आहेत असे वाटते.