अतिशय रंजकपणे लिहिलेला कलनाचा इतिहास छानच वाटला वाचताना. अनेक दिवसांपासून शोधत असलेले कलन/विकलन/समाकलन हे शब्दही कळले म्हणून अधिकच आनंद झाला. आता माझ्या लेखांमधे गरज पडल्यास हे शब्द मला वापरता येतील. धन्यवाद.

भारतीयांनी कलनाचा वापर सर्वप्रथम केला असे मानणारा एक भारतीय वर्ग आहे. तुम्ही लिहिलेल्या भास्कराचार्य व माधवाच्या उल्लेखाबाबत अधिक माहिती मिळाल्यास लिहाल का? हा वर्ग भास्कराचार्यांनी कलनाचा शोध लावला असेही मानतात. त्यात किती तथ्य मानावे?