वेदश्री ,

     चांगला विषय आहे. पण रूढी व समजुती याबद्दल थोडेसे. सद्या नवरात्र चालु आहे. रोज रात्री गरबा , काही ठिकाणी भोंडला असे नाचगाण्यांचे जुने प्रकार जागर म्हणून चालू आहेत. आदिशक्तीला नृत्य ,गायन प्रिय होते पण ते दूष्ट शक्तींचा पराभव करून 'स्तवन' या स्वरूपात असे वाचनात आले. पण आजकाल सिनेमाची गाणी, रिमिक्स , ध्वनीप्रदूषण नको म्हणून हेडफोन , कपड्यांच्या स्टाइल्स , वाढत्या दराने तिकिटांचा सौदा होऊनच प्रवेश  इ. आधुनिक बदल होत जात आहेत. नवरात्रीचे पावित्र्य या धिंगाण्यात किती दिसून येते ? आता म्हणे [आजच वाचले ]या मेळाव्यातून लग्नही जुळवण्याचा प्रस्ताव येतो आहे. बऱ्याचजणांचा माझ्या ह्या विचारांवर आक्षेप येणार हे जाणूनच हे मत व्यक्त करीत आहे.