आपण म्हणत आहात ते 'सराय', 'सराई' नव्हे (इंग्रजी मध्ये sarai लिहितात खरे पण ते 'राय' ला ही असेच काहीसे लिहितात असे वाचून आहे, शिवाय हिंदी व उर्दूची आपली ओळख इंग्रजीतून नाही). उत्तरेत अनेक जागांची, गावांची व भागांची नावे सराय बाळगून आहेत उदा. मुग़लसराय, व दिल्लीतले अनेक भाग. (दिल्लीतले लोक सराईत आहेत असे यावरून म्हणता येईल :) ) 

तर हा नवा प्रश्न सराईत या शब्दाचा उगम/अर्थ काय? त्याचा सराई शी संबंध आहे का? की शहरी, सभ्य पासून तो धूर्त बिलंदर बनला?