गुरुकुल पद्धती अस्तित्वात असतानाची गोष्ट.

एकदा एक गुरुजी प्रवचन करत होते. आश्रमात नवीनच आलेले एक मांजर तिथे लुडबुड करत होते. इकडे तिकडे पळ, कोणाच्यातरी पायाशी खेळ, असे त्याचे चालू होते. सर्वांचं लक्ष विचलित होते आहे हे पाहून गुरुजींनी प्रवचन संपेपर्यंत त्या मांजराला दोरीने बांधून ठेवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला. मग प्रवचन चालू असताना त्या मांजराला नित्यनेमाने दोरीने बांधून ठेवणे चालू झाले.

जुने विद्यार्थी जाऊन नवीन आले, ते गुरुजी जाऊन त्यांची जागा नवीन गुरुजींनी घेतली, ते मांजर सुद्धा मेले. पण तरी प्रवचन चालू असताना मांजर बांधून ठेवायची पद्धत बंद पडली नाही. आणि ती एक रूढीच बनली.

(ही कथा कुठे वाचली हे आठवत नाही. 'मनोगत'वर वाचलेली असणे शक्य आहे.)

त्यामुळे आपल्या रूढी/परंपरा सद्य परिस्थितीत तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टया योग्य आहेत का हे तपासाव्या असे वाटते.