रात्री अंधार पडल्यावर देवी लक्ष्मी घरी येत असते त्यामुळे घर झाडू नये किंवा कधी झाडावेच लागले तरी कचरा घराबाहेर टाकू नये, असे केल्यास देवी लक्ष्मी कोपिष्ट होऊन रुसून निघून जाते असे सांगितले जाते.
पुर्वीच्या काळी रात्रीच्या वेळेस उजेडासाठी चिमण्या वापरल्या जात ज्यांचा पुरेसा उजेड पडत नसे. काही मौल्यवान वस्तू ( जसे की सोन्याचे डुल, पायातली साखळी वगैरे ) खाली पडलेली असल्यास अशा अंधुक उजेडात झाडताना लक्षात न आल्याने कचऱ्याबरोबर तीही फेकली जाण्याची शक्यता असे. म्हणून अंधारात झाडू नये, असे सांगण्यासाठीच ही पद्धत वापरण्यात आली असावी.
आज विविध प्रकारच्या सोयींमुळे रात्रीच्या वेळी लख्ख उजेड मिळणे शक्य झालेले असल्याने स्वच्छतेला जास्त प्राधान्य देत ही रुढी कालबाह्य ठरवावी का?