श्रीराम, आपला मुद्दा तीन टप्प्यांमध्ये मांडलात तर आपली भूमिका नीट स्पष्ट होऊन आपलं म्हणणं नीट समजेल. ते तीन मुद्दे पुढीलप्रमाणे :
१.चालू असलेली रुढी व ती चालू ठेवण्यामागे सांगितली जाणारी कारणमिमांसा.
२.ती रुढी सुरू होण्यामागे काय कारण असू शकेल याबद्दलचं आपलं मत.
३. ती आत्ता चालू ठेवायला हवी वाटत असल्यास का? काही बदल अपेक्षित असल्यास कोणते व का? आणि ती रुढी कालबाह्यच करावी असे मत असल्यास तसे का? याबद्दलची आपली भूमिका.
या तीन टप्प्यात आपण आपले मत मांडू शकलात तर निश्चितच चांगले काही समोर येण्याची शक्यता निर्माण होईल.