समाजाचा जो आपल्या अन्नात वाटा असतो तो समाजाला देणे व आपल्या अन्नाची सोय करणाऱ्यांना उदरनिर्वाहाची सोय करायला, रक्षण करायला आवाहन करण्यासाठी जेवायला सुरुवात करण्यापुर्वी चित्राहुती (अन्नातील काही भाग काढून ताटाच्या उजवीकडे काढून ठेवून ताटाभोवती पाणी फिरवणे ) द्यावी.

पुर्वी जास्तकरून शेणाने सारवलेली घरे असायची. अशा ठिकाणी जेवायला बसता चित्राहुती न दिल्यास किडमुंगी सरळ ताटात जायच्या. भूतदया अपेक्षित असल्याने त्यांच्यासाठी अन्न काढून आपल्या ताटातले अन्न त्यांच्या उपद्रवापासून वाचावे यासाठी पाण्याची त्या किडमुंगींना अनुल्लंघनीय रेषा आखणे, हा चित्राहुतीमागचा मूळ हेतू असावा,

आजकाल भारतीय बैठकीत जेवण जेवतानादेखील घर बांधण्याच्या आधुनिक पद्धतींमुळे किडमुंगीचा पुर्वीइतका उपद्रव होणे आढळून येत नसल्याने चित्राहुती न दिल्यासही चालेल असे म्हटल्यास वावगे ठरेल काय?