धन्यवाद श्री. सुनील,
छोट्या-छोट्या प्रॉन्सनाच श्रीम्प्स् असे म्हणतात. प्रॉन्स वेगवेगळ्या आकारात येतात. ते साधारणपणे एका किलोत किती बसतात ह्यावर त्यांचा आकार मोजला जातो. जसेः-
१०० ते १२०, ८० ते १००, ६० ते ८०, ४० ते ६०, २० ते ४०, १० ते २० वगैरे..वगैरे...वगैरे. १०० ते १२० हा लहान आकार झाला तर १० ते २० हा मोठ्ठा.
१०० ते १२० पेक्षाही हे आकाराने लहान असतात त्यांना श्रीम्प्स् असे म्हणतात, ह्या श्रीम्प्स् मध्येही 'सलाड श्रीम्प्स्' म्हणून एक अजून लहान प्रकार येतो.
१० ते २० हा तसा मोठा आकार. पण एका किलोत फक्त ४च येतील (म्हणजेच एक प्रॉन पाव किलोचा) असेही गोड्या पाण्यातले प्रॉन्स मिळतात.
अगदी छोटे (सलाड श्रीम्प्स्) सलाड साठी वापरतात. त्याहून मोठे, पण श्रीम्प्स्, भाजी सारखे कोरडे करतात, १०० ते ६० पर्यंतच्या आकारात कालवण, कोलंबी भात (प्रॉन्स पुलाव) इ. करतात, त्याहून मोठ्या प्रॉन्सना बार्बीक्यूत वापरतात.