३. बलात्काराच्या "त्या" केस बद्दल असे वाचनात आले आहे की स्त्रीनेच "आता माझ्याशी कोण लग्न करणार" असे म्हटल्यावर आरोपीने लग्नाची तयारी दाखवली व ती कोर्टाने मान्य करून सुटका केली. अर्थात हे अपवादात्मक परिस्थितीत समजू शकतो.
विनायक,
त्या स्त्रीने जरी असे म्हटले असले तरी न्यायाधीशाने कायद्याच्या
चौकटीतच राहायला हवे होते. न्यायाधीशांचा प्रत्येक निवादा एक न्यायिक
पायंडा - legal precedent - पाडतो आणि हा पायंडा खालच्या
न्यायालयांवर बंधनकारक असतो.तेव्हा कोणताही खटला अपवादात्मक होऊ शकत नाही.
अहो, म्हातारी मेल्याचे दुःख नसले तरी काळ सोकावतो त्याचे काय?
मिलिंद