वरील स्पष्टीकरण म्हणजे मिथ्यविज्ञानाचा अस्सल नमुना आहे. केवळ उजव्या कानावर एक शीर असते हे एक(आता ही रक्तवाहिनी आहे का मज्जा हे गुलदस्त्यात), ती वीर्यरक्षण करते हे दुसरे आणि लघवीवाटे वीर्य "वाया" जात असते हे तिसरे. ह्या विधानांना काहीही वैज्ञानिक आधार नाही. निव्वळ पोकळ दावे आहेत. 
अशा रुढी न पाळणारे मुस्लिम आणि अन्य देशात रहाणारे पुरुष ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे का? त्यांचे पुरुष फार दुबळे आणि आपले जानवेधारी पुरुष फार वीर झालेत असे दिसते का?
वरील विधानांना पडताळून पहायला कुणी प्रयोग केलेत का?

मला वाटते ह्यात आजिबात तथ्य नाही.