सध्या पाकिस्तानात भूकंपाने ३०००० लोकांची जीवित हानी होण्याची वार्ता आहे. सुदैवाने आपल्या पंतप्रधानांनी पाकिस्तानाला लगेचच शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. अश्या विपत्तीत भारताने आपल्या उपजत मोठेपणाचे दर्शन घडवावे असा कोणीही संवेदनशील मनुष्य म्हटल्याशिवाय राहणार नाही.
अर्थातच भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रांतातही प्राणहानी झालेली आहे. अश्या नैसर्गिक आपत्तीत दोन्ही देश अजूनही जवळ येवोत हीच प्रार्थना.