रात्री झाडण्यामागचे वेदश्री जोशींचे स्पष्टीकरण योग्य आहे असे वाटते. पहाटे सूर्योदयापूर्वी वा मळभ आल्याने अंहार झाल्यावर अंधाराची स्थिती रात्रीच्या तुलनेत फारच कमी काळ असते. त्यामुळे पहाटे वा मळभ आल्यानंतर अंधारात झाडल्यास नंतर वस्तू हरविल्याचे लक्षात आल्यास ते परत मिळवणे त्यामानाने सोपे कारण थोड्याच वेळात उजेड होणार आहे. मात्र रात्री कचऱ्यामधे एखादी वस्तू गेल्यास व तो कचरा रात्रीच बाहेर टाकला व सकाळी वस्तू हरविल्याचे लक्षात आले, तर मधे बराच काळ गेलेला असल्याने वस्तू परत मिळण्याची शक्यता त्यामानाने कमी.