कोकणात वगैरे सात आठ दिवस उघडीप न ठेवता पाऊस कोसळतो. तेव्हा कायम अंधारून आलेले असते.
रात्री बाहेर जाऊन कचरा टाकण्यापेक्षा पहाटे झाडलेला कचरा सकाळ झाल्यावर बाहेर टाकला जाण्याची शक्यता जास्त.
असो.
 संध्याकाळी झाडल्याने वस्तु हरवू शकते असा जर विचार मुळात होता तर त्याला लक्ष्मी निघून जाते  असे रुप द्यायची काय गरज आहे? मूळ उद्देश इतका सहज समजू शकणारा आहे की त्याला असले रुपक देऊन आपण समाजाची दिशाभूल केली आहे. त्याला एक रुढी बनवली आहे. हे चूक आहे. घातक आहे.