आता हे सगळे होत असेल तर दुर्वांच्या औषधी गुणांचा कुणाला उपयोग होतो आहे? तोडलेल्या सगळ्या दुर्वा वायाच गेल्या नाही का?

माझ्याही सांगण्याचा हेतू हाच आहे. आज औषधी दुकानांमधून उपलब्ध असलेल्या औषधींचा वापर वाढलेला असल्याने आपल्या परंपरागत आयुर्वेदशास्त्राला जाणून घेण्याबद्दल खूप उदासीनता दिसून येते. पुर्वीच्या काळी असे नव्हते असे वाटते. देव्हाऱ्यात ठेवलेल्या/वाहिलेल्या जिनसा गरज पडल्यास वापरल्या जायच्या, किंबहुना त्या सहजी हाती लागाव्यात यासाठीच तिथे असायच्या. आता त्यामागील ही वैद्यकीय भूमिका समजावून न घेता केवळ एक रूढ झालेली गोष्ट म्हणून ती अनुसरली जात आहे. गरज पडता दुर्वा वापरणे होणार असेल तर ही रूढ आजही चालू ठेवायला हरकत नाही, परंतू असे होणार नसल्यास या औषधीची नासाडी थांबलेली उत्तम असे वाटते.

केवळ गणेशचतुर्थीलाच तोडले जावे इतके तण थोड्या काळापुरते असते का?


गणेशोत्सव हा साधारण सप्टेंबर महिन्यात येतो जेव्हा पाऊस परतीच्या वाटेवर असतो. यावेळेस तण काढले गेले तर उपयोगी ठरू शकते म्हणून ही रूढ आली असावी असा मी तर्क केला. अर्थात हा एक तर्क आहे, दावा नाही.