संध्याकाळी झाडल्याने वस्तु हरवू शकते असा जर विचार मुळात होता तर त्याला लक्ष्मी निघून जाते असे रुप द्यायची काय गरज आहे?

आपल्या संस्कृतीमध्ये 'लक्ष्मी' ही धनसंपत्तीची देवता मानली जाते. 'लक्ष्मी रुसून निघून जाईल' यातून 'मौल्यवान वस्तू हरवून जाऊ शकते.' असा अर्थ अभिप्रेत असावा. 

मूळ उद्देश इतका सहज समजू शकणारा आहे की त्याला असले रुपक देऊन आपण समाजाची दिशाभूल केली आहे.

वडीलधाऱ्या मंडळींनी सूचक शब्दात सांगितलेल्या गोष्टीचा योग्य तो अर्थ समजावून न घेता समजेल त्या अर्थाने गोष्टी आचरत गेल्याने आज खरे अर्थ हरपले आहेत. गर्भितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न न करता रुढींना घेऊन मार्गक्रमण आपण करत आहोत पण म्हणून दिशाभूल केली असे म्हणून वडीलधाऱ्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही असे वाटते. आपण योग्य अर्थ लावायचा प्रयत्न करून ही 'दिशाभूल' थांबवू शकतो.