बायका, मुंज न झालेली मुले चित्राहुती घालत नाहीत. मग त्यांच्या पानात किडेमुंगी गेले तरी चालतात का?


पुर्वीच्या काळी बायका त्यांच्या नवऱ्याच्या जेवणानंतर त्यांच्याच ताटात जेवायच्या, त्यामुळे किडमुंगीपासून बचावार्थ वेगळ्याने 'तटबंदी' उभारायची गरज त्यांना पडत नसावी. तसेच मुलांची मुंज व मुलींचे लग्न लहान वयातच होत असल्याने मुंज न झालेली मुले व लग्न न झालेल्या मुली यांनी वेगळ्याने जेवणे होत नसावे असे वाटते. आईवडलांकडून भरवले जात असल्याने त्यांना चित्राहुतीची गरज नसणार असे गृहित धरले गेले असावे.

जर किड्यामुंगीपासून रक्षण हा उद्देश होता तर समस्त जन हा विधी का करत नसत?

याबद्दल काही वैज्ञानिक तर्क असू शकेल असे वाटत नाही. याचे मूळ तत्कालीन समाजरचनेत शोधावे का?