सुवर्णमयी,
सहलीची सुरुवातच एवढी तणावपूर्ण आहे की, 'पुढे काय होणार' ही उत्सुकता दर वाक्यागणिक वाढतच जाते. अव्यवस्था, अनियमितता, डास, मुंग्या आणि रातकिडे ही फक्त भारताची मक्तेदारी नाही ही माहिती सुखावह असली तरी तुझ्या मनस्थितीची कल्पना करवत नाही. स्वतःच्या सुखासाठी नाही, तर दुसऱ्याच्या सुखासाठी, त्यातही आई-वडिलांच्या सुखा-समाधानासाठी धडपडताना येणाऱ्या अशा अनुभवातून जी अगतिकता वारंवार छळते त्याने, अचानक सर्व जगच आपले वैरी का व्हावे? असे वाटू लागते. असो.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.....