मंदार, एकेक भाग वाचत जाताना छान गुंगून गेले होते. शेवटी क्रमशः पाहून हिरमोड झाला दोन्ही भागांमध्ये कारण कथा संपत नाही तोवर थांबावं लागलं तर अगदी जीवावर येतं माझ्या. मी लवकरात लवकर मूळ पुस्तक विकत घेऊन वाचून काढणार आहे आणि ही इच्छा निर्माण करण्याचं सर्व श्रेय तुला आणि तुझ्या या लिखाणाला आहे. रोर्कला कधीच तडजोड करावी लागू नये असं वाटतं आहे, पण प्रत्यक्षात काय झालं ते जाणून घेण्याची जबरदस्त उत्सुकता आहे. पटापट लिही, मी वाचते आहे...