व्याही भोजन हे प्रत्यक्ष लग्नात न होता लग्नाचे काही दिवस आधी होते असे वाटते.
पूर्वीच्या समजुतीप्रमाणे मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या सासरी पाणीसुद्धा घेऊ नये असे म्हणत असत. म्हणून मुलीच्या सासरकडचे लोक सोयरिकीवर शिक्कामोर्तब (म्हणजे लग्न!) व्हायच्या आधी मुलीच्या माहेरकडच्यांना जेवण घालतात. यामागचे समज ('आई-वडिलांनी मुलीच्या सासरी पाणीसुद्धा घेऊ नये') हे आज जरी लागू नसले किंवा सौम्य झाले असले तरी प्रथा चालू आहे. (आपल्याला हे कारण माहित असेलच पण मी उत्साहाच्या भरात लिहिले आणि आता खोडायचे जीवावर आले आहे.)
जेवण करून 'पडी' (वामकुक्षी) टाकायची... 'भोजन करून पड'... या कारणाने कदाचित 'पडभोजन' म्हणत असावेत.