पड शब्दाचा अर्थ दुय्यम (सेकन्डरी), कमी महत्वाचे असा आहे.  त्यामुळे पडभोजन म्हणजे जे मुख्य जेवण नाही असे जेवण, यावरून मुलाकडच्या लोकांनी दिलेले भोजन पडभोजन म्हणत असावेत.

नवऱ्यामुलाच्या धाकट्या भावाला "पडजावई" म्हणण्याची प्रथा आहे.  म्हणजे यालग्नात तो जावई नसला तरी लवकरच तो स्वतः जावई म्हणून लग्नाला उभा राहील.

पड खाणे, पड घेणे (पडीची बाजू घेणे) म्हणजे मुख्य (जोरदार) भूमिका सोडून कमी म्हत्वाची बाजू घेणे हे आपल्याला माहिती असेलच.

कलोअ,
सुभाष