एक म्हणजे पुरुषाच्या ताटात बायकांनी जेवायचे ही पद्धत सर्रास नव्हती. निदान ब्राह्मणात तरी. माझ्या आजी वा त्यापूर्वीच्या पिढ्यातही हे मी पाहिलेले नाही.
दुसरे, विधवांचे काय? त्यांनी कोणाच्या ताटात जेवायचे? त्यांना ही तटबंदी वर्ज्य का होती?
>>
तसेच मुलांची मुंज व मुलींचे लग्न लहान वयातच होत असल्याने मुंज न झालेली मुले व लग्न न झालेल्या मुली यांनी वेगळ्याने जेवणे होत नसावे असे वाटते. आईवडलांकडून भरवले जात असल्याने त्यांना चित्राहुतीची गरज नसणार
<<
हे अतीच होते आहे. मुंजी आणि लग्ने अर्भकावस्थेत होत नव्हती त्यामुळे अशी स्थिती नक्की असेल की मुलगा वा मुलगी आपले आपण खात आहे आणि तरी तटबंदी नाही. आणि अन्न भरवले गेले तरी ते ताटातच असणार ना? मग त्यांच्या ताटाभोवती ही तथाकथित तटबंदी का केली जात नव्हती?
आणि किटकांपासून तटबंदी करायची होती तर चित्राय स्वाहा चित्रगुप्ताय स्वाहा वगैरे पेक्षा अमक्या किड्यापासून रक्षण होवो, तमक्यापासून होवो असे का म्हटले जात नव्हते?
मला वाटते हे स्पष्टीकरण ही नंतरची मखलाशी आहे. त्यात काही अर्थ नाही.