२. अल्पवयीन मुलामुलींना लग्नाचा अधिकार देणे हा खरोखर प्रतिगामी निर्णय आहे, त्याचे कोणतेही समर्थन होऊच शकत नाही... विनायक
विनायक,
आपल्याकडे कायद्याने मुलींना १८ आणि मुलांना २१ वर्षांनंतर लग्नाचा अधिकार दिला आहे. पण समाजात तसे पाहायला मिळते का? आजही कायद्याची पदवीधर असलेली आणि ३० वर्षे होवून लग्नाचे वय उलटून गेलेली मुलगी आपले आई-बाबा म्हणतील त्याच मुलाशी लग्न करतात. आपल्या भविष्यातील जोडीदाराबाबतीत निर्णय घेण्याची त्यांना ना पालकांकडून सवलत ना त्यांची इच्छा!
वयात आलेल्या मुलांना नैसर्गिक, शारीरिक गरजांची जाणीव होवू लागली आणि तशी सोय नसली की मग अगस्तींनी दाखवलेली साईट सायबर कॅफेत जाऊन पाहायची. ह्याला पुरोगामित्व म्हणायचे का ??
"माझ्याशी लग्न कोण करणार?" हा प्रश्नच का निर्माण होतो मनात? एवढी असुरक्षितता का ?
कोर्ट मानवतावादावर नाही चालवता येणार का? अगदी अशा केसेसबाबतीतही?! कायदा मानवनिर्मित आहे आणि माणसांसाठी आहे. मग अशा सुधारणा का नसाव्यात? theory of relativity मला भौतिकशास्त्रात नाही कळली. पण समाजात राहताना कायद्याच्या चौकटीत, शिक्षणक्षेत्रात आणि राजकारणात हिच गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
समाजव्यवस्था महत्वाची की कायदा ? माणसाची जात, धर्म, लिंग आणि सामाजिक पत महत्वाची मानायची की समाजस्वास्थ्य?