विलास,
आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते लक्षात आले नाही.
"माझ्याशी लग्न कोण करणार?" हा प्रश्नच का निर्माण होतो मनात? एवढी असुरक्षितता का ?
असुरक्षिततेचाच प्रश्न जर आपल्याला महत्वाचा वाटत असेल तर
मग पूर्वीची बालविवाहाची पद्धत काय वाईट होती? पाळण्यातच बाळांची लग्न
लावून टाकली की झालं.वरील प्रश्न आपोआप बाद होतो. असुरक्षितता, अनिश्चितता,
काही उरत नाही.
कोर्ट मानवतावादावर नाही चालवता येणार का? अगदी अशा केसेसबाबतीतही?!
मग कायदे हवेतच कशाला? 'मानवतावाद' या गोंडस नावाखाली
स्वैराचार,मनमानी, करण्याची नागरिकांना मोकळिक आणि
स्वतःच्या वैयक्तिक मतांनुसार, दृष्टीकोनानुसार निवाडा करण्याची
न्यायाधिशांना मोकळिक.सारं काही आपापल्या सोयीनुसार चालू द्या. 'सर्वे सुखीनः सन्तु' !