आहे की स्त्रीनेच "आता माझ्याशी कोण लग्न करणार" असे म्हटल्यावर आरोपीने लग्नाची तयारी दाखवली व ती कोर्टाने मान्य करून सुटका केली. अर्थात हे अपवादात्मक परिस्थितीत समजू शकतो.

मिलिंद,
मी वरील संदर्भात "मानवतावाद"उल्लेखला आहे. त्या स्त्रीच्या अपेक्षेत न्याय दिला गेला आहे;असाच अर्थ निघतो वरील वाक्यातून. असुरक्षिततेची भावना त्या स्त्रीची आहे. माझी नव्हे.जर अशा केसेस मध्ये "अपवाद" म्हणून पाहिले जात असेल आणि कायदा गुंडाळून ठेवला जात असेल तर मग?? ह्याला तुम्ही काय म्हणणार ? 
बालविवाहाला प्रोत्साहन देणे हा माझा उद्देश्य नव्हता,नाही आणि नसेल. पण नैसर्गिक प्रेरणा दाबून मग स्वैराचाराला उत्तेजन देणे हे सुधारणेचे द्योतक आहे का? लग्न करण्यासाठी वय महत्त्वाचे की शारीरिक विकास? मानसिक तयारी की मानसिक घुसमट?! गुजराथ मध्ये नवरात्रीनंतर MTP चे प्रमाण किती असते हे मी स्वतः पाहिले आहे... माझ्या मित्रांच्या हॉस्पिटलमध्ये. ही बातमी वाचा
सुधारणा?-1259031,curpg-1,fright-0,right-0.cms

ह्याला आपण पुरोगामी म्हणणार का ? समाजाला कोणती दिशा ह्यातून मिळणार आहे ? ह्याला तुम्ही काय म्हणणार ? मानवतावाद?! समाजसुधारणा ?! समाजविकास ? की मोकळिक.सारं काही आपापल्या सोयीनुसार चालू द्या. 'सर्वे सुखीनः सन्तु' !